लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

पुढील १० संदेश विषय २: खोकला, सर्दी आणि आजार

 1. स्वयंपाक करणाऱ्या शेकोटीच्या धुराचे छोटे कण फुफ्फुसात जाऊ शकतात आणि आजार निर्माण करू शकतात. बाहेर किंवा ताजी हवा आत येऊ शकते आणि धुर बाहेर जाऊ शकतो अशा जागी स्वयंपाक करून धुर टाळा.sa,, picture of a person coughing
 2. तंबाखू धूम्रपान फुफ्फुसे कमकुवत करतो. इतर लोकांच्या धूम्रपान करण्यापासून होणारा धूर देखील हानिकारक आहे.
 3. प्रत्येकाला खोकला आणि सर्दी होते. सर्वाधिक त्वरीत चांगले होतात. जर खोकला किंवा सर्दी 3 आठवडे अधिक असेल तर आरोग्य चिकित्सालयात जा.
 4. जंतूंचे काही प्रकार असतात ज्यांना जिवाणू आणि व्हायरस असे म्हणतात. सर्वात अधिक खोकला आणि सर्दी होण्यास व्हायरस कारणीभूत आहे आणि औषध वापरून ह्यापासून बचाव केला जाऊ शकत नाही.
 5. फुफ्फुसे हा शरीराचा श्वास घेणारा भाग आहे. खोकला आणि सर्दी फुफ्फुसे कमकुवत करतात. न्युमोनिया हा एक जीवाणू रोग असून तो कमकुवत फुफ्फुसातील गंभीर आजारांना कारणीभूत असतो.
 6. न्यूमोनियाची लक्षणं (एक गंभीर आजार) जलद श्वास घेणे आहे. श्वास ऐका. छातीवर आणि खाली जान्याची प्रक्रिया पहा . ताप, आजार आणि छाती दुखणे ही इतर लक्षणे आहेत.
 7. जर 2 महिन्यांपेक्षाही कमी वयाच्या अर्भकाने एक मिनिट किंवा त्याहून अधिक श्वासोश्वास सोडला तर त्वरित आरोग्य तज्ञाकडे संपर्क साधा. १ ते ५ वर्षांच्या मुलांमधील जलद श्वासोच्छवास 20-30 श्वासो प्रति मिनिटहुन अधिक असतो.
 8. एक चांगला आहार (आणि स्तनपान बाळांना), धूम्रपान मुक्त घर आणि लसीकरण गंभीर आजार जसे न्यूमोनिया टाळण्यासाठी मदत करते.
 9. खोकला किंवा सर्दीवर उबदार राहून, चवदार पेये वारंवार पिऊन (सूप आणि रस), आराम करून आणि आपल नाक स्वच्छ ठेवून उपचार करा.
 10. खोकला, सर्दी आणि इतर आजार एकमेकांपासून पसरवणे थांबवा . हात, जेवणाची आणि पाण्याची भांडी स्वच्छ ठेवा आणि खोकताना हातरुमालाचा वापर करा.

हे आरोग्य संदेश तज्ज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासले गेले आहेत तसेच ओआरबीच्या आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.health-orb.org.

या विषयांबद्दल अधिक जाणून तसेच हे संदेश पसरवण्यासाठी मुलं पुढील गोष्टी करू शकतात.

खोकला, सर्दी आणि आजार: मुले काय करू शकतात?

 • सर्दी, खोकला या विषयांवर आपले स्वतःच्या शब्दांत आणि भाषेत स्वतःचे संदेश बनवा.
 • संदेशांचे स्मरण करा जेणेकरुन आपण त्यांना कधीच विसरू नये.
 • इतर मुलांना आणि आपल्या कुटुंबांला संदेश समजावून सांगा.
 • कुठे धुम्रपान आहे , कुठे नाही? कुठे लहान मुलांसाठी धुरापासून दूर खेळण्यासाठी सुरक्षित आहे? अशा मुद्यांचा विचार करून आपल्या घराची योजना बनवा.
 • पालकांना आपल्या मुलांना गोवर आणि डांग्या खोकल्यासारखे धोकादायक रोग लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पोस्टर तयार करा.
 • यूमोनिया बद्दल गाणे बनवा आणि आपल्या कुटुंबासह आणि मित्रांबरोबर ते सामायिक करा.
 • जलद श्वासोच्छ्वास आणि जेव्हा श्वसन होणे सामान्य होते ते मोजण्यासाठी दोरा आणि दगड असलेली एक पेंडुलम तयार करा. आपण जे काही शिकलो ते आपल्या कुटुंबाला दाखवा.
 • लहान मुलांचे स्तनपान करवण्याबद्दल आपले स्वतःचे नाटक बनवा.
 • ताप असताना थंड राहणे आणि सर्दी असताना उबदार राहणे यावर नाटक बनवा.
 • खाण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने हात धुण्यास मदत करण्यासाठी घर आणि शाळेसाठी टिप टॅप तयार करा.
 • जंतू प्रसार रोखण्यासाठी आणि खोकला आणि सर्दीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हात साबण व पाण्याने कसे धुवावे हे शिका.
 • निमोनिया किंवा सर्दी अशा विविध परिस्थितींचा अभ्यास करून न्यूमोनियाची आपली माहिती तपासून पहा.
 • युमोनियासाठी धोक्याची लक्षणे काय आहेत हे विचारा. आपण जे काही शिकलो ते कुटुंबाला समजावून सांगा.
 • कुठे धूम्रपान बाध्य आहे हे विचारा. तुमची शाळा धुम्रपानमुक्त आहे का?
 • काय आपला श्वास जलद करते हे विचारा. जेव्हा कोणी न्यूमोनियापासून धोक्यात आहे आणि जलद श्वास ओळखणे शिकण्यासाठी आम्ही आपला श्वास मोजू शकतो.
 • विचारा खोकला आणि सर्दीचे उपचार करण्याचे नवीन आणि जुने मार्ग काय आहेत?
 • विचारा जिवाणूंचा प्रसार कसा होतो ? हॅन्ड शेकींग खेळ खेळून शिका.

टिप टॅप, पेंडुलम किंवा हॅन्ड शेकींग खेळाबद्दल किंवा अधिक माहितीसाठी www.childrenforhealth.org किंवा clare@childrenforhealth.org वर संपर्क साधा.

मराठी Home