लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

पुढील १० संदेश विषय ३: लसीकरण

 1. दरवर्षी जगभरातील लाखो पालक खात्री करून घेतात की त्यांची मुलं बलशाली होतील तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून त्यांचा लसीकरण करून घेतात.
 2. जेव्हा तुमि एखा संसर्गजन्य आजाराने आजारी पडत, तेव्हा एक सूक्ष्म, अदृश्य जीवाणुने तुमच्या शरीरात प्रवेश केला आहे. हा जीवाणू आणखी जीवाणू बनवतो आणि तुमच्या शरीराची काम करण्याची क्षमता कमी करतो.
 3. आपल्या शरीरात सैनिकांसारखे संरक्षक असतात ज्यांना आपण प्रतिपिंडे म्हणतो. ते ह्या जीवाणूंबरोबर लढतात तसेच जेव्हा हे जीवाणू मारतात, ते तुमच्या शरीरात तुमचं संरक्षण करण्यासाठी राहतात.
 4. लसीकरनाद्वारे आपल्या शरीरात प्रतिजन प्रवेश करतात (लसीकरण इंजेक्शनद्वारे किंवा तोंडाद्वारे केले जाते).ते आपल्या शरीराला रोगाचा प्रतिकारकरण्यासाठी लागणारी प्रतिपिंडे बनवण्यास शिकवतात.
 5. काही लस एकपेक्षा अधिक वेळेस घ्यावी लागतात जेणेकरून तुमच्या शरीरात रोगापासून बचाव करण्यासाठी पुरेसे प्रतिजन तयार होतील.
 6. मृत्यू आणि दुःख देणारे भयंकर रोग, जसे की गोवर, क्षयरोग, डिप्थीरिया, डांग्या खोकला, पोलिओ आणि धनुर्वात (आणि अधिक!), यासगळ्यांचा लसीकरण करून प्रतिबंध केला जाऊ शकतो.
 7. आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी आपण रोगाचा संसर्ग होण्याआधी लसीकरण करणे आवश्यक आहे.
 8. मुलांना लवकरात लवकर सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे लसीकरण केले पाहिजे. जर एखाद्या मुलाची संधी हुकली तर त्याचा लसीकरण नंतर करता येऊ शकतं.
 9. वेगवेगळ्या आजारनसाठी वेगवेगळ्या वेळी मुलांचे लसीकरण करता येऊ शकते. आपल्या जवळ कुठे आणि केव्हा लसीकरण चालू आहे ह्याची माहिती ठेवा.
 10. प्रतिबंधाच्या दिवशी शिशु किंवा लहान मूल थोडे अस्वस्थ असले तरी त्यांचे लसीकरण करता येईल.

हे आरोग्य संदेश तज्ज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासले गेले आहेत तसेच ओआरबीच्या आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.health-orb.org.

या विषयांबद्दल अधिक जाणून तसेच हे संदेश पसरवण्यासाठी मुलं पुढील गोष्टी करू शकतात.

लसीकरण: मुले काय करू शकतात?

 • स्वतःचे लसीकरण संदेश स्वतःच्या शब्दात व स्वतःच्या भाषेत बनवू शकतात!
 • हे संदेश पाठ करू शकतात, जेणेकरून ते केव्हाच विसरणार नाहीत!
 • हे संदेश दुसऱ्या मुलांना व परिवारांना सांगू शकतात!
 • लसीकरण दिवसासाठी पोस्टर बनवून ते अश्याजागी लावू शकतात जिथे सर्वाना दिसेल.
 • एक अशी गोष्ट (चित्रांसहित) बनवू शकतात ज्यात सुपरहिरो लसीकरण प्राणघातक आजारणसोबत लढून आपला बचाव करतायत.
 • असे आजार ज्यांचा प्रतिबंध तुम्ही लसीकरणने करू शकता, जसे की डिप्थीरिया, मेसल्स आणि रुबेला, पेर्टुसिस, टीबी, टिटॅनस आणि पोलियो, यांचे एक किंवा एकपेक्षा पोंस्टर बनवू शकता.
 • डिप्थीरिया, मेसल्स आणि रुबेला, पेर्टुसिस, टीबी, टिटॅनस आणि पोलिओ यांसारख्या प्रतिजैविकेद्वारे रोखू शकणाऱ्या रोगांचे पोस्टर बनवा
 • एक नाटक किंवा गोष्ट बनवू शकता ज्याचे प्रमुख पात्र “Aunty Body” म्हणून असेल, एक अशी Aunty जी दयाळू, मजबूत रक्षक आहे व आपल्याला सुरक्षित आणि चांगले ठेवते.
 • प्रत्येक रोगाबद्दल जाणून घ्या आणि इतर मुलांसह आणि आपल्या कुटुंबियांसोबत जे काही शिकतो ते सामायिक करा.
 • एका नवीन बाळाला आणि त्याच्या आईला एक वाढदिवस कार्ड द्या, ज्याच्यात त्यांच्या लसीकरणाच्या वेळा असतील, जेणेंकरून त्यांना जीवनाचा एक आनंदी आणि निरोगी प्रथम वर्ष मिळेल!
 • अश्या आजारांबद्दल जाणून घ्या ज्याच्यामुळे आपण लसीकरणाने वाचू शकतो.
 • विकलांग मुलांना मदत करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
 • आपल्याला लसीकरण बद्दल किती माहिती आहे हे जाणण्यासाठी एका प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करा. तसेच हि प्रश्नमंजुषा आपल्या मित्रांमध्ये आणि कुटुंबासह सामायिक करा.
 • अश्या लसींची माहिती करून घ्या ज्या आपल्याला एकापेक्षा अधिक वेळेस लागतात व ज्या मुलांनी ह्या लसी टाळल्या आहेत त्यांची माहिती करून घ्या
 • रोगाच्या सुपर पावर काय आहेत आणि लसीकरण ह्या सुपर पॉवर चा कसा खात्मा करते ते शोधा.
 • आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाने व शिक्षकाने आपल्या सर्व लसी घेतल्या आहेत ह्याची खात्री करा.
 • अश्या काही विशेष लसीकरण दिवसांची व कार्यक्रमांची माहिती करून घ्या जिथे सगळी लहान मुलं व बाळ लसीकरण करून घेण्यासाठी जाऊ शकतात.
 • एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जर लसीकरण चुकवले आहेत तर त्याची माहिती करून घ्या, जेणेकरून ते लस घेऊ शकतात.
 • आपल्या देशातील उपलब्ध लसीकरणची माहिती तसेच तुम्ही केव्हा ते घेऊ शकता त्याची माहिती करून घ्या.
 • आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला एखाद्या घातक रोग झाला असल्याची माहिती करून घ्या व त्यांना काय झाला होता ह्याची माहिती करून घ्या.

अधिक माहितीसाठी www.childrenforhealth.org किंवा clare@childrenforhealth.org वर संपर्क साधा.

मराठी Home