लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

पुढील १० संदेश विषय ४: मलेरिया

 1. मलेरिया हा एक संसर्गग्रस्त डासांच्या चाव्याव्दारे पसरतो.
 2. मलेरिया घातक आहे. यामुळे ताप येतो आणि विशेषत: मुले आणि गर्भवती स्त्रियांना यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
 3. किटकनाशक मारलेल्या मच्छरदाणीखाली झोपून डासांचा चावा थांबवा आणि मलेरियापासून बचाव करा
 4. मलेरियाचे डास अनेकदा सूर्यास्त आणि सूर्योदय दरम्यान चावतात.
 5. जेव्हा लहान मुलं-मुलींना मलेरिया होतो तेव्हा तो हळूहळू वाढत जातो.
 6. मलेरियाच्या मच्छराला मारण्यासाठी तीन प्रकारे कीटकनाशक वापरण्यात येतात: घरात, हवेत आणि पाण्यात.
 7. अधिक ताप, डोकेदुखी, सर्दी, स्नायू आणि पोटदुखी हे मलेरियाची लक्षणे आहेत. त्वरित चाचण्या आणि उपचार जीवन वाचवू शकतो.
 8. आरोग्याविषयी माहिती ठेवणाऱ्यांच्या मदतीतीने आणि संबधीत औषधांनी मलेरिया रोखता येऊ शकतो.
 9. मलेरिया हा संक्रमित व्यक्तीच्या रक्तात राहतो आणि अशक्तपणा आणू शकतो ज्यामुळे ती व्यक्ती थकते आणि कमकुवत होते.
 10. मलेरियासातीच्या गोळ्या घेतल्याने मलेरिया असलेलया ठिकाणी मलेरिया आणि ऍनेमिया रोखता येऊ शकतो किंवा कमी करता येतो.

हे आरोग्य संदेश तज्ज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासले गेले आहेत तसेच ओआरबीच्या आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.health-orb.org.

या विषयांबद्दल अधिक जाणून तसेच हे संदेश पसरवण्यासाठी मुलं पुढील गोष्टी करू शकतात.

मलेरिया: मुले काय करू शकतात?

 • स्वत: च्या भाषे स्वतःचे मलेरियासंबधी संदेश बनवा.
 • संदेश पाठ करा ज्याकरून तुम्ही ते विसरू नयेत.
 • इतर मुलांना आणि कुटुंबियाना संदेश समजू सांगा.
 • मलेरियाचा प्रसार कसा होतो हे इतरांना दाखवण्यासाठी पोस्टर बनवा आणि त्यांनाही तुमच्या मोहिमेत सामील करून घ्या.
 • डासांच्या जीवन चक्राबद्दल इतर मुलांना सांगण्यासाठी किंवा नाटक तयार करा!
 • कीटकनाशक उपचारित मच्छरदाणीचा वापर कसा करा हे दाखवण्यासाठी पोस्टर तयार करा!
 • कथा आणि पोस्टर बनवून इतरांना डास चावण्यापासून कसे वाचायचे हे समजून सांगा.
 • एक मुलगा दुसऱ्या मुलाला मलेरिया झाला आहे हे कसा ओळखतो आणि प्रौढांना त्याची चाचणी घेण्यासाठी सांगतो हे कथेद्वारे सादर करा.
 • मलेरिया आणि ऍनेमीयाच्या लक्षणांवर कथा किंवा नाटक तयार कराकी आणि किटकनांमुळे अशक्तपणा येतो आणि मलेरियामुळे अशक्तपणा कसा होतो हे सादर करा.
 • आपल्या परिसरातील लोह समृध्द अन्नघटकांबद्दल पोस्टर्स बनवा.
 • डासध्या चाव्यापासून लहान मुलांना वाचवा.
 • मच्छरदाणी नीट अंथरलेली आहे आणि तिला छिद्रे नाही याची खात्री करा.
 • लोकांना मच्छरदाण्या का आवडतात आणि का आवडत नाही तसेच त्यांचे मच्छरदाणीविषयी काय मत आहे यावर कथा किंवा नाटक तयार करा.
 • मच्छरदाण्यांचा वापर कसा करायचा हे लोकांना दाखवण्यासाठी मोहिम राबवा.
 • आरोग्य कर्मचा-यांना तुमच्या शाळेत बोलवा आणि मोठ्या मुलांसोबत बेडच्या जाळ्या व रोगांच्या चाचण्यांविषयी बोलायला सांगा.
 • इतरांसह संदेश समजावण्यासाठी गाणे, नृत्य आणि नाटकांचा उपयोग करा.
 • हे प्रश्न विचारा. आणि यांची उत्तरे शोधा . तुमच्या कुटुंबातील किती लोकांना मलेरिया झाला आहे हे प्रौढांना विचारा? आपण मलेरियापासून बचाव कसा करू शकतो? टिकाऊ कीटकनाशक उपचार केलेले जाळ (लिन्स ) कसे आणि केव्हा टांगायचं आणि खिडकीच्या पडद्याचा वापर कसा करावा आणि त्याच काय काम आहे ? लोक परिसरात लिन्स कधी मिळवू शकतात? मलेरिया कसा मार्क आहे ? गर्भवती स्त्रिया आणि मुलांसाठी मलेरिया विशेषतः धोकादायक का आहे? आरोग्य कर्मचारी बाळ असलेल्या महिलांना मलेरियापासून वाचवण्यासाठी काय आणि केव्हा देतात ? लोहा आणि लोहयुक्त पदार्थ (मांस, काही अन्नधान्य आणि हिरव्या पालेभाज्या) कशा प्रकारे ऍनेमिया टाळण्यास मदत करतात? लोक स्वतःला आणि इतरांना डासांच्या चावण्यापासून कसे वाचवू शकतात? रक्तातील हिवताप तपासण्यासाठी असलेल्या विशेष चाचणीला काय म्हणतात?

अधिक माहितीसाठी www.childrenforhealth.org किंवा clare@childrenforhealth.org वर संपर्क साधा.

मराठी Home