लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

पुढील १० संदेश विषय ५: अतिसार

 1. अतिसारामूले पातळ विष्टा दिवसाच्या तीन किंवा अधिक वेळा होते.
 2. दूषित पदार्थ किंवा पेयाच्या सेवनाने जिवाणू तोंडात जाऊन किंव गलिच्छ चमचा किंवा कप वापरून बोटांनी स्पर्श केल्यानेही अतिसार होउ शकतो.
 3. पाणी आणि क्षार (द्रव) कमी होणे शरीराला कमकुवत करते. जर त्यांचे प्रमाण वाढले नाही तर अतिसार शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे मुलांना मारू शकतो.
 4. स्वच्छ पाणी, किंवा नारळ किंवा तांदळच्या पाण्या सारखे सुरक्षित पेय देऊन अतिसार टाळता येतो. बाळास सर्वात जास्त स्तनपान आवश्यक आहे.
 5. अतिसार असलेल्या मुलाचे तोंड आणि जीभ कोरडे पडते, डोले खोल जातात, अश्रू नाही येत , त्वचा सैल आणि हात आणि पाय थंड पडतात. बाळाच्या डोक्यावर एक ठिसूळ जागा असू शकते.
 6. एक दिवसात पाचवेळापेक्षा जास्त हागणारी किंवा रक्तरंजित हागणारी पाचपेक्षा मुले किंवा जे अनेकदा उलटी होण्याची शक्यता असलेल्याना त्वरित डॉक्टरला दाखवावे.
 7. ओआरएस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. दवाखाने आणि दुकाने येथे ओआरएस मिळते. अतिसाराच्या उपचारासाठी पेय करण्यासाठी स्वच्छ पाण्यात चांगले मिसळून प्या.
 8. बहुतांश अतिसार औषधे कार्य करत नाहीत परंतु 6 महिन्यांपर्यंत मुलांना जस्त (झिंक) गोळी लवकर उपाय करते. त्यांना ओआरएस पेये देणेही आवश्यक आहे.
 9. अतिसार असलेल्या लहान मुलांना चविष्ट आणि तंतुमय पदार्थ असलेले जेवण द्या ज्यामुळे जितके शक्य तितक्या लवकर त्यांचे शरीर मजबूत होईल.
 10. लहान मुलांना स्तनपान केल्याने, स्वछता राखल्याने, लसीकरण (विशेषत: रोटावायरस आणि गोवर साठी) आणि पौष्टिक आहाराने अतिसार टाळता येऊ शकतो.

हे आरोग्य संदेश तज्ज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासले गेले आहेत तसेच ओआरबीच्या आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.health-orb.org.

या विषयांबद्दल अधिक जाणून तसेच हे संदेश पसरवण्यासाठी मुलं पुढील गोष्टी करू शकतात.

अतिसार: मुले काय करू शकतात?

 • आपल्या स्वतःच्या भाषेत अतिसाराविषयी संदेश बनवा.
 • संदेशांचे स्मरण करा जेणेकरुन आपण त्यांना कधीच विसरू नये!
 • इतर मुलांना आणि कुटुंबियांना संदेश समजावून सांगा.
 • माश्यांना पकडण्यासाठी साधे जाळे तयार करा कारण त्या माश्या आपले अण्णा दूषित करतात.
 • इतरांना अतिसाराचे धोके दर्शविण्यासाठी एक पोस्टर तयार करा.
 • आरोग्य कर्मचाराणा कसे आणि केव्हा बोलवावे यावर एक लहान नाटक आणि पोस्टर तयार करा.
 • अतिसार करणे कसे थांबवावे हे शिकण्यासाठी आम्हाला एक सापसीडीचा खेळ बनवण्यासाठी मदत करा.
 • ओआरएस असलेल्या, घर आणि शाळेसाठी प्रथमोपचार पेट्या तयार करा.
 • आपल्या बाळांना अतिसारापासून कसे वाचवावे याविषयी बोलताना दोन महिलांचा संवाद सादर सादर करा.
 • अतिसाराच्या लक्षणांबद्द्ल (जसे कि शरीरात पाण्याची कमतरता) आपल्याला किती माहिती आहे हे तपासण्यासाठी अतिसार असलेल्या बाळाच्या चित्राला नावे देण्याचा खेळ खेळा.
 • वनस्पतींना वाढण्यासाठी पाण्याची का गरज आहे आणि – वनस्पतींना पाणी नसताना काय होते ते शोधा.
 • स्वतःला आणि इतरांना अतिसार होऊ नये म्हणून आपल्या सभावोतली स्वछता राखा.
 • जंतू किती लवकर पसरू शकतात ते शोधण्याकरता हात मिळवणीचा खेळ खेळा.
 • खालील प्राची उत्तरे शोधा . आपल्या पालकांना किती काळ स्तनपान दिले गेले? ओआरएस आणि झिंक असलेल्या घरी अतिसारावर कसा उपचार करता येतो? आरोग्य कर्मचाऱ्यानंकडून मदत कधी मागावी आणि अतिसाराची असलेली धोक्याची चिन्हे काय आहेत? आपलेल्या अतिसार असल्यास कोणते पेय सुरक्षित आहेत? सूर्यप्रकाशाचा वापर करून आपण पाणी सुरक्षित कसे ठेवू शकतो? आपल्याकडे ओ आर एस नसताना कोणते पेय सुरक्षित आहेत? हगवण आणि कॉलरा म्हणजे काय आणि ते कसे पसरतात?

माश्यांसाठी जाळे, हातमिळवणीचा खेळ किंवा सूर्यप्रकाशाचा उपयोग करून निर्जंतुकीकरण करणा-याविषयी किंवा इतर कशावरही अधिक माहितीसाठी www.childrenforhealth.org किंवा clare@childrenforhealth.org वर संपर्क साधा.

मराठी Home