लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

पुढील १० संदेश विषय ६: पाणी आणि स्वच्छता

 1. हात स्वच्छ धुण्यासाठी पाणी आणि साबणाचा वापर करा. 10 सेकंद घासून हात स्वच्छ करा आणि स्वच्छ कोरड्या कपड्यावरच हात पुसा, गलिच्छ कपड्यावर नाही.
 2. आपला चेहऱ्यावर (डोळे, नाक आणि तोंड- टी झोन ) स्पर्श करण्यापूर्वी आपले हात योग्य प्रकारे धुवून घ्या, कारण त्यामुळेच जिवाणू शरीरात शिरतात. जेव्हा शक्य आहे तेव्हा टी-झोनला स्पर्श करणे टाळा.
 3. अन्न तयार करण्याआधी, जेवण करण्याआधी किंवा बाळांना अन्न देण्याआधी ,मूत्र विसर्जनानंतर , बाळाला स्वच्छ केल्यावर किंवा आजारी असलेल्यांना मदत केल्यानंतर हात नक्की स्वच्छ करा .
 4. आपल्या शरीर आणि कपडे स्वच्छ ठेवा. आपले नखे आणि बोटे, दात आणि कान, चेहरा आणि केस स्वच्छ ठेवा. शूज / चप्पल कीटकांपासून संरक्षण करतात.
 5. माणुस आणि पशूंची विष्टा माश्यांच्या संपर्कात येऊ नका देऊ आणि माश्यांपासून दूर राहा कारण ते रोगराई पसरवतात. शौचालय वापरा आणि त्यानंतर आपले हात धुवा.
 6. आपला चेहरा ताजा आणि स्वच्छ ठेवा आणि त्याला थोडे स्वच्छ पाणी आणि साबनाणे सकाळी आणि संध्याकाळी किंवा माश्या आसपास फिरत असल्यावर स्वच्छ धुवा.
 7. गलिच्छ हाताने किंवा कपाने स्वच्छ पाण्याला स्पर्श करू नका. पाणी सुरक्षित आणि जंतू पासून मुक्त ठेवा.
 8. सूर्यप्रकाश पाणी सुरक्षित ठेवतो. पाणी प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये स्वच्छ करून 6 तास ठेवा जेणेकरून ते पिण्यास सुरक्षित असेल.
 9. धुणे झाल्यावर प्लेट्स आणि भांड्यावरील कीटकांना मारण्यासाठी सूर्यप्रकाश शक्य तेव्हा वापर करा.
 10. घर आणि सभोवताली कचरा आणि घाण होऊ नये म्हणून ठेवून माश्यांचे मारा किंवा त्याची वाढ थांबवा. जोपर्यंत कचरा गोळा, जाळला किंवा पुरला जात नाही तोपर्यंत साठवून ठेवा.

हे आरोग्य संदेश तज्ज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासले गेले आहेत तसेच ओआरबीच्या आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.health-orb.org.

या विषयांबद्दल अधिक जाणून तसेच हे संदेश पसरवण्यासाठी मुलं पुढील गोष्टी करू शकतात.

पाणी आणि स्वछता: मुले काय करू शकतात?

 • आपल्या स्वतःच्या भाषेत, आपल्या स्वतःच्या शब्दांत पाणी आणि स्वच्छतेबद्दल संदेश तयार करा.
 • संदेशांचे स्मरण करा जेणेकरुन आपण त्यांना कधीच विसरू नये!
 • इतर मुलांना आणि कुटुंबियांना संदेश समजावून सांगा.
 • आपले हात कसे धुवावे ते शिकण्यास मदत करण्यासाठी एक गाणे शिकून घ्या.
 • स्वच्छ कुटुंब जेव्हा गावात असते तेव्हा तेथे जिवाणूचे काय होते किंवा जिवाणू कुठे लपतात
 • हे नाटकातून सादर करा.
 • आपल्या लहान भावांना आणि बहिणींना हात स्वच्छ कसे ठेवावे यासाठी मदत करा
 • लोकांच्या एका समूहाचे निरक्षण करा आणि शोधून काढा कि ते किती वेळा त्यांच्या तोंडाला, कपड्याना आणि इतरांना स्पर्श करतात.
 • जिवाणू किती प्रकारे हातामुळे शरीरात प्रवेश करू शकतात यावर विचार करा.
 • शाळेतील शौचालय स्वच्छ असल्याची खात्री करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करा.
 • चाळणी वापरून पाणी कसे स्वच्छ करावे ते जाणून घ्या.
 • शाळा कंपाऊंड स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी योजना बनवा.
 • शाळेत एक स्वच्छता क्लब सुरू करा.
 • माश्या , घाण आणि जिवाणूबद्दलची माहिती आपल्या कुटुंबियांना समजावून सांगा.
 • पाण्याच्या माठाला स्वच्छ आणि झाकून ठेवा आणि नेहमी एक वरंगळ वापरा, कधीही आपला कप किंवा हात वापरू नका. आपल्या लहान भाऊ-बहिणींना भांड्यातून पाणी कसे घ्यावे हे दाखवा.
 • एकत्र मिळून नळ बनवा.
 • आपल्या साबयासाठी खोक कसा बनवायच हे शिकून घ्या. प्लॅस्टिकची बाटली आणि काही साखर पाणी किंवा विष्टा वापरून माश्यांसाठी जाळे तयार करा.
 • सूर्यप्रकाशाचा वापर करून घरी पिण्यासाठी स्वच्छ पाणी तयार करा.
 • गलिच्छ पाणी स्वच्छ करण्यासाठी वाळू वापरून चाळणी तयार करा.
 • आपल्या परिसरातील पाणी पुरवठ्याचा नकाशा बनवा आणि ते पिणे सुरक्षित आहे की नाही हे शोधून काढा.
 • स्वयंपाकाची भांडी आणि ताटल्यांसाठी रॅक बनवा जेणेकरून ते सूर्यप्रकाशात वाळन्यासाठी ठेवता येईल.
 • खालील प्रश्नांची उत्तरे शोधा .आपले हात स्वच्छ आणि जंतूपासून मुक्त कसे ठेवावे? हात धुण्यासाठी घरी साबण आहे का? स्थानिक दुकानात साबण घ्यायला किती खर्च येतो? आपले शरीरात स्वच्छ कसे ठेवायचे? दात कसे घासायचे? जिवाणू कुठुन येतात, कुठे राहतात आणि ते कसे पसरतात? माश्या कसे राहतात, खातात आणि पुनरूत्पादन करतात? माश्या पायाने घाण कशी पसरवतात. आपले जलस्त्रोत काय आहेत? आपण खराब पाणी पिण्याजोगे कसे करू शकतो? आपण प्लास्टिकच्या बाटल्या कुठे मिळवू शकतो? पाणी फिल्टर म्हणून कोणते कापड वापरले जाऊ शकते? अन्न तयार करताना कुटुंबाचे सदस्य स्वच्छतेविषयी कोणती काळजी घेतात. घर किंवा सभोवताली कुठे जास्त जिवाणू असू शकतात ?

माश्यांच्या जाळ्यासाठी अधिक, विशिष्ट माहितीसाठी, पाणी निर्जंतुक करण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर कसा करायाचा, वाळूपासून पाणी स्वच्छ करण्यासाठी चाळणी कशी बनवायची, साबणासाठी खोके किंवा छोटा नळ कस बनवायचा किंवा इतर अधिक माहितीसाठी www.childrenforhealth.org किंवा clare@childrenforhealth.org वर संपर्क साधा.

मराठी Home