लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

पुढील १० संदेश विषय ७: पोषण

 1. अन्न जे आपले खाद्य आहे, अन्न जे आपल्याला वाढवते, आणि अन्न जे आपले पोषण करते तेच चांगले अन्न आहे जे आपले शरीर मजबूत बनवते!
 2. आपण जर खूप थोडे खाल्ले किंवा खूपच जंक फूड खाल्ले तर कुपोषण होते. बसून जेवल्याने   आणि चांगले अन्न योग्य प्रमाणात घेतल्याने आपण हे टाळू शकतो.
 3. २ वर्षांखालील मुलांची व्यवस्थित वाढ होत आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रत्येक महिन्यात ५ s चिकित्सालयात वजन करणे आवश्यक आहे.
 4. जर मुलांचा चेहरा किंवा पाय पातळ झाला असेल किंवा सुजला असेल अथवा मुल खूप शांत झाले असेल तर त्यांना आरोग्य कर्मचार्‍याला दाखवणे गरजेचे आहे.
 5. जेव्हा मुले आजारी असतात तेव्हा त्यांची भूक कमी होऊ शकते. अशा वेळी त्यांना चांगले पेय आणि सूप द्या, आणि चांगले होताना सामान्यपेक्षा अधिक अन्न द्या.
 6. बाळासाठी जन्मापासून ते ६ महिने स्तनपान आवश्यक आहे. हे दुध बाळाला वाढीसोबत चमक पण देते.
 7. ६ महिन्यांनंतर बाळाला स्तनपानासोबत दिवसातून ३ किंवा ४ वेळा कौटुंबिक अन्न आणि जेवण दरम्यान नाश्ता आवश्यक आहे.
 8. प्रत्येक आठवड्यात विविध रंगांचे नैसर्गिक पदार्थ खाणे हा एक संतुलित आहार घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
 9. लाल, पिवाळी आणि हिरवी फळे आणि भाज्या सूक्ष्म पोषक घटकानी भरलेली असतात. हे पोषक घटके पाहण्यासाठी फार लहान असतात, परंतु ते आपल्या शरीराला मजबूत करतात.
 10. आपण खाल्लेले आणि शिजवलेले अन्न धुवून टाकुन रोग टाळा. शिजवलेले अन्न त्वरीत वापरा किंवा साठवा.

हे आरोग्य संदेश तज्ज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासले गेले आहेत तसेच ओआरबीच्या आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.health-orb.org.

या विषयांबद्दल अधिक जाणून तसेच हे संदेश पसरवण्यासाठी मुलं पुढील गोष्टी करू शकतात.

पोषण: मुले काय करू शकतात?

 • आपल्‍या स्वत: च्या भाषेत आपल्या स्वतःच्या शब्दांचा वापर करून आपले स्वत: चे पोषण संदेश तयार करा!
 • संदेशांना स्मरण करा जेणेकरुन आपण त्यांना कधीच विसरू नये!
 • इतर मुलांसह आणि आपल्या  कुटुंबांबरोबर संदेश प्रसार करा.
 • विकास आराखडा/चार्ट शोधा आणि बघा, तसेच मित्राबरोबर आणि पालकाबरोबर त्‍याचा अर्थ काय आहे हे जाणून घ्या. या आराखड्‍याला आरोग्‍यमार्ग असेही म्‍हणतात आणि हा आराखडा/चार्ट आपल्‍याला केद्रात पहायला मिळु शकतो.
 • एक आरोग्य केद्रात  जा आणि निरीक्षण करा जेव्हा बाळांचे वजन केले जाते आणि वाढ आराखड्‍यावर  काढले जाते.
 • बाळांचे आणि लहान मुलांचे वजन आणि मापन कसे केले जाते ते बघा.
 • जर तिथे कुणी कुपोषित मुल असेल तर विचारपुस करा अाणि माहिति काढा कि त्‍याची मदत कशी केली जाते.
 • नमुद करा की, प्रत्येक आठवड्यात माझे कुटुंब काय  खाते? प्रत्येक आठवड्यात आम्ही किती नैसर्गिक रंग खातो?आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला वाढीसाठी पुरेसे अन्न मिळते का? आपल्याला कसे कळेल? आपल्‍यात कोणी वयोवृद्ध किंवा लहान आहे का ज्‍याची कमी-जास्‍त काळजी घ्‍यावी लागेल?
 • अन्न केव्‍हा लोकाना आजारी करते या विषयी विचारा आणि ऐका.
 • एखादे मूल कुपोषित आहे हे अोळखण्‍यासाठी पालकांना, आरोग्‍य कर्मचार्‍याना किंवा ‌‍ इतरांना विचारा.
 • लहान मुलांसाठी आणि लहान मुलांसाठी वाईट असलेले अन्न आणि प्रत्येक खाद्मेच्या खालच्या रस्ता का खराब का असावा असे एक चित्र चार्ट काढा.
 • माता आपल्या बाळाला प्रथम अन्न याची माहिती करून घ्या आणि सहा महिन्यांनंतर उत्तरांची नोंद करून एक तकता बनवा आणि आपल्या मित्रांना दाखवा.
 • जे अन्न लहान मुले आणि लहान मुलांसाठी वाईट असतात असे अन्न दर्शवित असलेले चित्र चार्ट काढा आणि ते अन्‍न वाईट का आहे ते समोर लिहा.
 • शोधा की आई आपल्‍या बाळाला पहिले अन्‍न म्‍हणुन काय देते आणि ६ महिन्‍यानंतर काय देते? ते किती वेळा आपल्या बाळांना खायला देतात? आणि याचे उत्‍तर नमुद करा व त्‍याचा चार्ट बनवा.
 • समाजातील बहुतेक लोकांसाठी कोणते जीवनसत्वयुक्‍त अन्नपदार्थ उपलब्ध आहेत हे शोधा आणि हे अन्नपदार्थ कसे तयार करतात (बाजारात आणि / किंवा घरी).
 • कशाप्रकारे अन्न तयार केले जाते,  ताट आणि भांडी कशी धुवून वाळवली जातात आणि अन्‍न तयार करणारा व्‍यक्‍ती जर हात धुत असेल तर तो हात कसा धुतो याचे निरी‍क्षण करा.
 • आपण एक आठवडाभर दररोज जे खाद्यपदार्थ  खातो त्याविषयी चित्र काढा आणि / किंवा लिहा. आपण चित्रांमध्ये रंग जोडू शकतो किंवा सर्व खाद्यपदार्थांसाठी रंगीत दर्शके करु शकतो.
 • विचारा कि,कसे वाढीचा आराखडा बाळाची वाढ तपासण्‍यासाठी मदत करतो? कोणत्‍या पद्धतीने शिळे अन्‍न किंवा बाटली अन्‍न किंवा इतर पद्धतीने अन्‍न ताजे ठेवल्‍या जाते? नैसर्गिकरित्या रंगीत अन्न खाणे महत्त्वाचे का आहे?कोणते अन्‍न पदार्थ चांगले असतात जेव्‍हा लोक आजारी पडतात?
 • आरोग्‍य कर्मचार्‍यांकडुन स्‍तनपानाविषयी माहिती घ्‍या आणि स्‍तनपानाचे महत्‍व समजुन घ्‍या.
 • विचारा की, कशाप्रकारे आपण आजारी असलेल्‍या मुलाला चांगले अन्‍न आणि पेय मिळवुन देऊ शकतो?
 • शोधुन काढा, की आपल्‍या समाजातील कोणत्‍या आई आपल्‍या बाळाला स्‍तनपान करते आणि का? स्‍तन-दुध कसे बाळाच्‍या वाढीनुसार बदलते? दुध-बाटल चे दुध बाळासाठी कसे घातक आहे?
 • मुले त्‍यांच्‍या भावंडाना किंवा इतरांना विचारु शकतात की, अन्‍न खराब झाले किंवा खाण्‍यास योग्‍य नाही हे कसे ओळखल्‍या जाते.

अधिक माहितीसाठी www.childrenforhealth.org किंवा clare@childrenforhealth.org वर संपर्क साधा.

मराठी Home