लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

पुढील १० संदेश विषय ८: आतड्यांसंबंधी जंतू

  1. जंतु मुलांच्‍या शरिरात प्रामुख्‍याने आतड्‍यांमध्‍ये आढळतात  जे आपण खाल्‍लेल्‍या अन्‍नावर जगत असतात.
  2. विविध प्रकारच्‍ाे जंतु आपल्‍या शरिरात आढळुन येतात: नायटा, प्रतोदकृमी, कृमी, पट्टकृमींची (मूत्राशय व आतडी यांना शिस्टोसोमा परजीवीकडून होणारा संसर्ग). अजुन इतर आहेत!
  3. जंतु आपल्‍याला कमजोर आणि आजारी करु शकतात. त्‍यांच्‍यामुळे खोकला, पोटदुखी, ताप आणि आजारपण.
  4. जंतु शरिरात असल्‍यामुळे ते अापण बघु शकत नाही पण त्‍यांना आपण पू मध्‍ये पाहु शकतो.
  5. जंतु आणि त्‍यांचे अापल्‍या शरिरात संक्रमण विविध प्रकारे होते. काही आहारामार्फत तर काही दुषित पाण्‍यामार्फत आणि काही अनवाणी पायांमुळे.
  6. जंतुना मारण्‍यासाठी डी-जंतु गोळ्‍या हा सोपा आणि स्‍वस्‍त उपाय आहे. या गोळ्‍या आरोग्‍य कर्मचारच‍यांमार्फत  प्रत्‍येक ६ ते १२ माहिन्‍यांच्‍या कालावधीत दिल्‍या जातात. काही जंतुसाठी हा कालावधी मोठा असतो.
  7. जंतुंची अंडी हि मुत्र आणि पु मध्‍ये असतात. शाैचालयाचा वापर करुन मुत्र आणि पु पासुन दुर राहा. वापर केल्‍यानंनतर आणि  लहान मुलाची मदत केल्‍यानंतर साबणीने हात नीट धुवा.
  8. मुत्रविसर्जन किंवा पु नंतर साबणीने हात धुतल्‍याने आणि स्‍वयंपाकाआधी, खाण्‍या-पिण्‍याआधी फळे-पालेभाज्‍या धुतल्‍याने ,आणि चप्‍पल घातल्‍याने  जंतुंचे संक्रमण टाळता येते
  9. काही जंतु मातीमध्‍ये असतात म्‍हणुन मा तीतुन आल्‍यानंतरआपले हात नीट धुवावे.
  10. पालेभाज्‍यांना किंवा फळांना पाणी घालताना ते पाणी मानवी मुत्र किंवा पु नसेल याचि काळजी घ्‍यावी.

हे आरोग्य संदेश तज्ज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासले गेले आहेत तसेच ओआरबीच्या आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.health-orb.org.

या विषयांबद्दल अधिक जाणून तसेच हे संदेश पसरवण्यासाठी मुलं पुढील गोष्टी करू शकतात.

आतड्यांसंबंधी जंतू : मुले काय करू शकतात?

  • आपल्‍या स्वत: च्या भाषेत आपल्या स्वतःच्या शब्दांचा वापर करून आपले स्वत: चे  जंतु संदेश तयार करा!
  • संदेशांना स्मरण करा जेणेकरुन आपण त्यांना कधीच विसरू नये!
  • इतर मुलांसह आणि आपल्या  कुटुंबांबरोबर संदेश प्रसार करा.
  • ‘आपल्या पायांनी मतदान करा’ या प्रश्नमंजुषेचा वापर करुन तुमची जंतुबद्यल माहिती तपासु शकतात.
  • जंतुबद्यलच्‍या गोष्‍टी ऐका ज्‍यामुळे नियमित पणे हात धुवुन आणि चप्‍पल घालणे लक्षात ठेवुन आपण जंतुंना थांबवु शकतो.
  • तुमच्‍या शाळेत अन्‍न कसे बनवल्‍या जाते आणि स्‍वयंपाकी अन्‍नाला जंतुंपासुन कसे काळजीपुर्वक ठेवतो हे शोधुन काढा.
  • नेहमी शैाचालयाचा वापर करा ज्‍यामुळे मुत्र आणि पु मातीत आणि पाण्‍यात मिसळल्‍या जाणार नाही.
  • हात स्‍वच्‍छ धुण्‍यासाठी योग्‍य साबण आणि पाणी तसेच स्‍वच्‍छ कपड्‍याची गरज असते.
  • सर्वेक्षण करा ज्‍यामुळे घरातील किती लोकांना जंतुबद्यल किती माहिती आहे हे समजेल.
  • एक जंतुविषयी नाटक बनवा ज्‍यामध्‍ये मुले कशी जंतुंना त्‍यांच्‍या कुटुंबाचे अन्‍न चोरन्‍यापासुन वाचवतात हे दाखवले असेल.
  • एक पोस्‍टर बनवा ज्‍यामध्‍ये अन्‍नाला सुरक्षित आणि जंतुंपासुन दुर कसे ठेवावे जसे – कच्‍च्‍या-पालेभाज्‍या खाण्‍यआधी धुवुन, मटण नीट शिजवुन आणि मग स्‍वयंपाक करुन अशा क्रिया असतील.
  • ‘टिप टिप नळ’ आणि हात धुन्‍याचे स्‍टेशन आपल्या कुटुंबासाठी,वर्गासाठी किंवा गटासाठी कसे बनवता येईल हे शोधा.
  • गाणे बनवा जे की आपल्‍याला जंतुंना प्रसरण्‍यापासुन किंवा हात कसे धुवावे याचे स्‍मरण करुन देईल.
  • असे एक पोस्‍टर बनवा जे आपल्‍याला पालेभाज्‍या आणि फळे खाण्‍यापुर्वी त्‍यांना धुन्‍याची आठवण करुन देईल.
  • आपण जंतुंच्‍या संक्रमणाला कसे थांबवु शकतो असे नाटक किंवा कठपुतळीचा कार्यक्रम.
  • आपल्‍याला जंतुंविषयी असलेलि माहिति तपासण्‍यासाठी रिकाम्‍या जागा भरा असा खेळ तयार करा अाणि खेळा किंवा हात कसे आणि केव्‍हा धुवावे याबद्यल प्रश्‍नावली तयार करा आणि खेळा. खालिल प्रश्‍न मदतीसाठी वापरा.
  • आपल्‍या शरीरात आपण जे अन्न खातो ते कसे वापरतात ते विचारा? अापली मोठी आतडी किती मोठी आहे? जंतु आपले अन्न कसे घेतात? एक लांबजंत किती वाढू शकते? किती प्रकारचे जंतु तुम्हाला माहित आहे?कोणत्‍या प्रकारच्‍ाे जंतु तुमच्‍या राहण्‍याच्‍या ठिकाणी आढळतात?  आपल्‍यात जंतु असण्‍याची चिन्हे काय आहेत?आपल्‍याला डी-जंतुचे औषध कुठे मिळवता येईल आणि कोणाला घेण्याची गरज आहे? प्रत्येक दिवशी एक जंतु किती अंडी बनवू शकतो? जंतु आपल्या शरीराबाहेर तसेच अन्न म्हणून इतर गोष्‍टी घेऊ शकतात जसे कि जीवनसत्‍त्‍व-अ पोषक तत्त्वे घेऊ शकतात- आपल्याला अ जीवनसत्वाची गरज का आहे? जंतुंच्‍या मुलांना अळ्या म्‍हणतात. अशी कोणती अळी आहे जी आपल्‍या शरिरात जाऊ शकते? शाैचालय वापरुन आणि पु पासुन सुरक्षितपणे दुर राहुन आपण कसे जंतु प्रसरण्‍यापासुन वाचवु शकतो?आपल्या शाळेत डी-जंतु दिवस आहे का? ते कधी? सर्वांना त्याच दिवशी डी-जंतु गोळ्या का देतात? जगातील किती मुलांना जंतु आहेत? जंतुंचे प्रसार थांबविणे का महत्‍त्‍वाचे आहे? आपल्‍या पाचक पध्दतीबद्दल – हे कसे कार्य करते आणि  जंतु हे काम थांबवण्यासाठी काय करते? एक जंतु-अंडी किती लहान असते? आपल्याला माहित असलेली सर्वात लहान गोष्ट कोणति? पाणी स्वच्छ किंवा गलिच्छ आहे हे आपण कसे सांगू शकतो? झाडांना वाढीची का आवश्यकता आहे? आपण वनस्पतींना पोसण्यासाठी सुरक्षित असल्यासारखी खत कशी बनवू शकतो?

‘टिप टिप नळ’ आणि हात धुण्‍याचे स्‍टेशन याबद्यल अधिक माहितीसाठी किंवा रिकाम्‍या जागा भरा खेळासाठी किंवा इतर अधिक माहितीसाठी www.childrenforhealth.org किंवा clare@childrenforhealth.org वर संपर्क साधा.

मराठी Home