लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

पुढील १० संदेश विषय ९: अपघात आणि दुखापतींपासून बचाव

 1. स्वयंपाक क्षेत्र लहान मुलांसाठी धोकादायक असु शकते. त्‍यांना आगीपासुन अाणि तिक्ष्‍ण किंवा अवजड गोष्‍टींपासुन दुर ठेवा.
 2. मुलांच्‍या श्‍वसनात आगीचा धूर येऊ देणे टाळा. त्‍याने खोकल्‍यासारखा आजारपण येऊ शकते.
 3. अशी कोणतीही गोष्‍ट जी विषारी आहे, ती मुलांपासुन दुर ठेवा आणि रिकाम्‍या हलके पेयच्‍या बाटल्‍यांमध्‍ये विष ठेवु नका.
 4. जर एखाद्‍या मुलाला चटका लागला असेल किंवा आगीच्‍या सानिध्‍यात आला असेल तर, दुखणे कमी होई पर्यंत जळालेला भाग थंड पाण्‍यात ठेवावा.(१० मिनिटिंसाठी किंवा जास्‍त)
 5. सायकल किंवा वाहनांमुळे दररोज मुलांचा अपघात होतो आणि बरेचसे मुले प्राण गमवुन बसतात. म्‍हणुन वाहनांपासुन सावध राहणे गरजेचे आहे आणि इतरांना सावध कसे राहावे हे दाखवा.
 6. लहान मुलांसाठी चाकु, विद्युत तारी, काच, नखे आणि इतर गोष्‍टी धोकादायक अाहेत.
 7. लहान मुलांच्‍या तोंडात किंवा जवळ जाऊन लहान गोष्टी देणे टाळा (उदा. नाणी, बटणे) कारण त्या गोष्टी मुलांचा श्वासोच्छवास रोखू शकतात.
 8. लहान मुलांचे पाण्‍याजवळ खेळणे टाळा जेथे ते पाण्‍याच्‍या स्‍त्रोतात पडु शकतात (नदी, तलाव , विहिर).
 9. घर किंवा शाळेसाठी प्रथमोपचार किट तयार करा (साबण, कात्री, जंतुनाशक आणि पूतिनाशक मलम, कापुसपट्‍टी, तापमापक, पट्ट्या / मलबा आणि ओआरएस).
 10. जेव्हा आपण एखाद्या लहान मुलासोबत नवीन कुठेतरी जाता तेव्हा जागृत रहा. लहान मुलांसाठी होऊ शकणारे धोके विचारा.

हे आरोग्य संदेश तज्ज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासले गेले आहेत तसेच ओआरबीच्या आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.health-orb.org.

या विषयांबद्दल अधिक जाणून तसेच हे संदेश पसरवण्यासाठी मुलं पुढील गोष्टी करू शकतात.

अपघात आणि दुखापतींपासून बचाव: मुले काय करू शकतात?

 • आपल्‍या स्वत: च्या भाषेत आपल्या स्वतःच्या शब्दांचा वापर करून आपले स्वत: चे अपघात आणि दुखापतींपासून बचाव करणारे संदेश तयार करा!
 • संदेशांना स्मरण करा जेणेकरुन आपण त्यांना कधीच विसरू नये!
 • इतर मुलांसह आणि आपल्या कुटुंबांबरोबर संदेश प्रसार करा.
 • सुरक्षितपणे विषाण/विष ठेवण्याबद्दल पोस्टर्स करा: त्यांना कसे संचयित करावे, त्यांच्यावर लेबल करा आणि मुलांना दूर ठेवा.
 • एक प्रथमोपचार पेटी तयार करा जी कोणी जखमी झाल्यावर वापरता येईल.
 • लहान मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित खेळणी बनवा.
 • संकटकालीन परिस्थितीसाठी एक दोरी व होडी तयार करा.
 • आपल्या शाळेसाठी एक प्रथमोपचार स्थान तयार करा.
 • एक सुरक्षा मोहीम तयार करा ज्याद्वारे तुम्ही सर्वांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेसाठी जागृती करू शकता.
 • आपल्या परिसरारात जिथे पाणी आहे तिथे एक सर्वेक्षण करा आणि अश्या जागांची माहिती करून घ्या जिथे लहान मुले बुडू शकतात तसेच अश्या जागांपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करता येऊ शकते त्याची माहिती करून घ्या.
 • “पण का? खेळ” एक अपघातासंबंधी खेळ, हा खेळ घरी खेळा.
 • आपले घर अजून सुरक्षित बनवण्यासाठी विचार करा आणि त्या कल्पनांचा प्रसार पोस्टर, गाणी व नाटकांमधून करा.
 • एका आरोग्य कर्मचाऱ्याकडून एका घरगुती व शाळेकरती प्रथमोपचार पेटीसाठी काय लागेल याची माहिती करून घ्या.
 • “धोके ओळखा” हा खेळ तयार करून खेळा. एका पोस्टर किंवा स्केच वर हा खेळ तयार करून तुम्ही त्यातले किती धोके ओळखू शकता ह्याची माहिती करून घ्या.
 • रस्त्यावरील मुलांच्या सुरक्षिततेबाबत एक जागृती मोहीम तयार करा.
 • भूमिका नाटक करा ज्यात तुम्ही एका लहान मुलाची काळजी घेताना त्याच्या सुरक्षेबद्दल जागरूक आहात.
 • प्रतिमोपचारची माहिती करून घ्या जेणेकरून तुम्ही संकटपरीस्थितीत मदत करू शकता. एक भूमिका नाटक तयार करा व आपल्या प्रथमोपचार कौशल्यांचा सराव करा आणि हे आपल्या कुटुंब व मित्रांसोबत सामायिक करा.
 • लहान मुलांसाठी आपल्या घरात असणारे धोके ओळखा व त्याचा एक नकाशा बनवा.
 • लहान मुलांना होऊ शकणाऱ्या इजाबद्दल आपल्याला जे माहिती आहे त्याचा मोठ्या लोकांबरोबर प्रसारण करा.
 • लहान मूल जेव्हा गळा दाटून येतो तेव्हा काय करायचा ते आपल्या आईवडिलांना, आजीआजोबाना व आपल्या भावाबहिणीला सांगा.
 • सामान्य धोके ओळखायला शिका जिथे भाजणे, पडणे, किंवा व्यस्त रहदारीचे रस्ते आहेत.
 • आपल्या घरी भाजण्याचे कोणते धोके आहेत ते विचारा? कोणाला भाजल्यावर आपण काय केले पाहिजे? लहान मुलांना स्वयंपाक घरातल्या गरम गोष्टींपासून कसं सुरक्षित ठेवता येईल? आपल्या समाजातील लोकं लहान बाळांना व मुलांना दूर ठेवतात का? – कसे? लहान बाळ व मुलं ह्यांनचा गाला दाटून येण्याची शक्यता मोठ्या व किशोर मुलांच्या तुलनेत जास्त का आहे? एका बुडणाऱ्या व्यक्तीला आपण स्वतःला कोणत्या धोक्यात न टाकता कसे वाचवू शकतो?

‘टिप टिप नळ’ कसे बनवतात किंवा प्रथमोपचार पेटीमध्ये काय असले पाहिजे किंवा “धोके ओळखा पोस्टर” याबद्दल अधिक माहितीसाठी www.childrenforhealth.org किंवा clare@childrenforhealth.org वर संपर्क साधा.

मराठी Home