लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

पुढील १० संदेश विषय १: बाळांची काळजी घेणे

 1. लहान बाळांबरोबर आणि मुलांबरोबर जितके शक्य असेल तितके खेळ खेळा, त्यांना कुरवाळl, बोला , हसा आणि गा.
 2. बाळ आणि लहान मुले सहजपणे क्रोधित होतात , घाबरतात , रडतात. त्यांना आपल्या भावना स्पष्ट मांडता येत नाही. नेहमी दयाळू राहा
 3. लहान मुले चालणे, आवाज करणे, खाणे आणि पिणे जलदगतीने शिकतात. त्यांना मदत करा परंतु त्यांना सुरक्षित चुका देखील करू द्या.
 4. सर्व मुली आणि मुले एकमेकांइतकी महत्त्वाची आहेत. सर्वांना चांगले आणि एकसमान वागवा, विशेषतः आजारी असलेल्या किंवा अपंग मुलांना.
 5. लहान मुले आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या कार्याद्वारे शिकतात . त्यांच्या जवळ असताना चांगली वर्तणूक करा आणि त्यांना चांगले मार्ग दाखवा.
 6. जेव्हा लहान मुले रडतात तेव्हा एक कारण असत (भूक, भीती, वेदना). ते कारण शोधण्याचा प्रयत्न करा.
 7. अंकगणित, शब्दकोष, रेखाचित्र आणि खेळ खेळून लहान मुलांना शाळेत शिकण्यास मदत करा त्यांना कथा सांगा, गाणी गा आणि नृत्य करा.
 8. एका समूहात नवजात बाळाची वाढ आणि त्याचे चालणे आणि बोलणे यासारख्या ‘प्रथम’ गोष्टी ते कसे करतात हे पहा. त्याची नोंद घ्या.
 9. तरुणांना आणि काळजीवाहूंना लहान मुलांची स्वच्छता (विशेषतः हात व चेहरे), सुरक्षित पाणी पिणे आणि पौष्टिक आहार तपासून रोग बरे करण्यास मदत करा.
 10. बाळांना आणि लहान मुलांना प्रेमळ काळजी द्या परंतु स्वत: बद्दल विसरू नका. तुम्हीही खूप महत्वाचे आहेत.

हे आरोग्य संदेश तज्ज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासले गेले आहेत तसेच ओआरबीच्या आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.health-orb.org.

या विषयांबद्दल अधिक जाणून तसेच हे संदेश पसरवण्यासाठी मुलं पुढील गोष्टी करू शकतात.

बाळांसाठी काळजी: मुले काय करू शकतात?

 • आपल्या स्वत: च्या शब्दात आणि आपल्या स्वत: च्या भाषेत ‘बाळांची काळजी घेणे’ या विषयावर स्वतःचे संदेश बनवा.
 • संदेश पाठ करा जेणेकरुन तुम्ही ते कधीच विसरू नये.
 • इतर मुलांना आणि आपल्या कुटुंबाला संदेश समझवून सांगा.
 • ‘मुले’ आणि ‘मुली’ या गटात विभागा; मुले ‘मुलींचे खेळ’ आणि मुली ‘मुलांचे खेळ’ खेळा. नंतर, दोन्ही गट खेळांवर चर्चा करा. उदाहरणार्थ, आपण मुले किंवा मुली खेळ म्हटल्या जाणाऱ्या खेळांसहमत आहात का? का किंवा का नाही?
 • घरी किंवा शाळेत ‘चांगले’ आणि ‘वाईट’ वर्तन समजावून सांगा. आणि त्यांचे असे वर्णन का आहे हेही समजा वून द्या.
 • या विषयाबद्दल आम्हाला काय माहित आहे ते इतरांना दाखवण्यासाठी तक्ते बनवा.
 • घरी, शाळेत किंवा समुदायाच्या गटांमध्ये मोबाईल ,प्राणी आणि चित्र पुस्तके बनविण्यासाठी स्पर्धा आयोजित करा.
 • रोगास टाळण्यासाठी सोपे पर्याय दर्शविणारे रेखाचित्र आणि पोस्टर तयार करा. उदारणार्थ, साबणाने हात धुणे, लसीकरण करणे आणि संतुलित आहार घेणे.
 • लहान मुलांबरोबर खेळताना देखभाल करणार्यांबद्दल एक लहान नाटक बनवा. तुम्ही दोन माता दरम्यान झालेला संवाद सादर करू शकतात ; एक जी असा विश्वास बाळगते कि लहान मुलांना शांत ठेवावे आणि दुसरी जी असा विश्वास बाळगते कि लहान मुलांनी मजा करावी. ह्या भावना केवळ चेहर्यावरील भाव आणि हातवारे सादर करून व्यक्त कराव्या. इतर मुले भावना काय आहे याचा अंदाज घेतील.
 • बाळांना काय रडवते आणि हसवते याबद्दल पालकांना आणि आजी-आजोबा विचारा. शोधून काढलेली माहिती वर्गाला समजावून सांगा.
 • वर्ग किंवा गट स्थानिक समुदायातून एका मुलाला दत्तक घेऊ शकतात. आई प्रत्येक महिन्याला त्या गटाला भेट देऊन बाळाच्या विकास प्रक्रियेबद्दल सांगू शकते.
 • रोग टाळण्यासाठी सोप्या चरणांचे वर्णन करणारे गाणे तयार करा. जसे स्वच्छ राहणे आणि सुरक्षित पाणी पीणे आणि हे गाणे लहान भावंडांसह घरी गा.
 • मोठ्या मुलांनी पालकांची मुलाखत घ्या आणि त्यांच्यासाठी आपल्या लहान मुलांना व लहान मुलांची काळजी घेताना कठीण काय होत आणि त्यांना सर्वात अधिक मदत कशामुळे झाली होती ते विचारा.
 • एखाद्या आरोग्य कर्मचा-यास किंवा विज्ञान शिक्षकाला बाळाचे मेंदू कसे वाढते याबद्दल आपल्याला अधिक माहिती देण्यास विचारा.
 • मोठी मुले समाजातील वृद्धांना त्यांना गाणी, कथा आणि खेळ शिकवण्यास विचारू शकतात. बाळांसाठी आणि लहान मुलांसाठी गाणी गा.
 • मुले प्रौढांना विचारू शकतात की बाळांना आजार होण्यापासून टाळण्यासाठी काय करणे महत्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी www.childrenforhealth.org किंवा clare@childrenforhealth.org वर संपर्क साधा.

मराठी Home