लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

पुढील १० संदेश विषय १०: एचव्ही आणि एड्स

 1. आपले शरीर आश्चर्यकारक आहे, आणि दररोज ते काही विशिष्ट मार्गानी आपले रोगांपासून संरक्षण करते, अश्या रोगांचे विषाणू जे श्वास, खाणे, पिणे किंवा स्पर्शने पसरतात.
 2. एचआयव्ही एक विषाणू आहे ज्याला आपण व्हायरस म्हणतो (V हे व्हीरॉस त्यासाठी आहे). हा एक विशेषतः घातक व्हायरस आहे जे आपल्या शरीराला स्वतःचे संरक्षण करण्यापासून थांबवतो.
 3. शास्त्रज्ञांनी एचआयव्हीला धोकादायक बनण्यापासून थांबवण्याकरिता औषधे तयार केली आहेत परंतु कोणालाही त्याला शरीरातून पूर्णपणे काढता येण्याचा मार्ग सापडला नाहीये.
 4. काही वेळेनंतर आणि औषधाशिवाय, एचआयव्ही ग्रस्त लोकांना एड्स होतो. एड्स काही गंभीर आजारांचा एक गट आहे ज्यामुळे शरीर कमकुवत व दुर्बल बनते.
 5. एचआयव्ही अदृश्य आहे आणि तो शरीरातील रक्तामध्ये व अश्या इतर द्रव्यांमध्ये राहतो जे संभोगादरम्यान तयार होतात. एचआयव्ही पुढीलप्रकारे पसरू शकतो: (1) संभोगावेळी, (2) संसर्गग्रस्त मातेपासून बाळांना (3) रक्ताद्वारे.
 6. संभोगापासून एचआयव्ही रोखण्यासाठी लोक पुढील उपाय करतात (1) संभोग ना करणे (2) आपल्या नातेसंबंधाबाबत विश्वासू असणे (3) निरोधचा वापर करून संभोग करणे (संरक्षित संभोग).
 7. आपण एचआयव्ही आणि एड्सग्रस्त लोकांबरोबर खेळू शकता, अन्न तसेच पेय वाटू करू शकता, त्यांचे हात धरू शकता व त्यांना मिठी मारू शकता. ह्या क्रिया सुरक्षित आहेत आणि यामुळे तुम्ही व्हायरसग्रस्त नाही होऊ शकत.
 8. एचआयव्ही आणि एडस्ग्रस्त लोकं काहीवेळा घाबरत आणि उदास असतात. सर्वांप्रमाणे त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना प्रेम आणि पाठिंबाची गरज आह. त्यांनी आपल्या चिंतांबद्दल बोलण्याची आवश्यकता आहे.
 9. स्वत: आणि इतरांना मदत करण्यासाठी, ज्यांना एचआयव्ही किंवा एड्स असण्याची शक्यता आहे त्यांनी एका क्लिनिक किंवा इस्पितळात जाऊन चाचणी आणि समुपदेशनसाठी केले पाहिजे.
 10. बहुतेक देशांमध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना मदत व उपचार मिळतात. एंटीरिट्रोव्हिरल थेरपी (एआरटी) नावाची औषधाने त्यांना दीर्घ आयुष्य जगण्यास मदत होते.

हे आरोग्य संदेश तज्ज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासले गेले आहेत तसेच ओआरबीच्या आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://www.health-orb.org.

या विषयांबद्दल अधिक जाणून तसेच हे संदेश पसरवण्यासाठी मुलं पुढील गोष्टी करू शकतात.

एचआयव्ही आणि एड्स: मुले काय करू शकतात?

 • आपले स्वतःचे एचव्ही आणि एड्सचे संदेश स्वतःच्या शब्दात आणि स्वतःच्या भाषेत करू शकतात!
 • हे संदेश पाठ करू शकतात जेणेकरून ते विसरणार नाहीत!
 • हे संदेश इतर मुलांमध्ये व इतर कुटुंबांमध्ये पसरवू शकता.
 • एचव्ही आणि एड्ससंबधी माहितीपुस्तिका व इतर माहिती गोळा करून आपल्या समाजात पसरवू शकता.
 • एका आरोग्य कर्मचाऱ्याला आपल्या शाळेत बोलावून एचव्ही आणि एड्ससंबधी माहिती घेऊ शकता.
 • आपल्या समाजातील एड्सग्रस्त मुलांना मदत करण्याचे मार्ग शोधणे.
 • “जीवनरेखा खेळ” हा खेळ खेळणे आणि धोकादायक वर्तनाबद्दल माहिती करून घेणे, जेणेकरून आपण एचव्हीग्रस्त होऊ शकतो.
 • एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे एचव्ही कसा जाऊ शकतो यासंबंधी “खरं किंवा खोटं” हा खेळ तयार करून खेळणे. जे “विचारा” प्रश्न आहेत ते खेळाच्या अखेरीस मदतीसाठी विचारावेत.
 • अशी जीवन कौशल्ये शिका ज्यामुळे तुम्हाला खास मैत्री आणि आपल्या लैंगिक भावनाबद्दल बोलता येईल.
 • “आशेची भरारी” हा खेळ खेळा आणि माहिती करून घ्या कि कोणते सुरक्षित वर्तन आपण निवडू शकतो ज्यामुळे आपला खास मैत्रीत एचव्हीपासून बचाव होऊ शकतो.
 • एचव्ही आणि एड्सग्रस्त व्यक्तीला कोणते गोष्टींना सामोरे जावे लागत असतील त्याचा विचार करा आणि आपण त्याची कोणत्याप्रकारे मदत करू शकतो ह्याचा पण विचार करा.
 • एक भूमिका नाटक करून त्यात एचव्हीग्रस्त व्यक्तीची भूमिका निभवा आणि माहिती करून घ्या एक एचव्हीग्रस्त व्यक्ती असल्यावर कसा वाटतं.
 • एचव्हीग्रस्त व्यक्ती आणि त्यांना झेलावे लागणारे कष्ट यासंबंधी गोष्टी एक व त्यावर चर्चा करा.
 • लोकांना एचव्हीबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी प्रश्नमंजुषा तयार करा.
 • आपल्या एचव्ही आणि एड्ससंबंधी प्रश्नांसाठी एक प्रश्न डब्बा सुरु करा.
 • आपल्या शाळेसाठी एक एचव्ही आणि एड्ससंबंधी पोस्टर बनवा.
 • एक नाटक तयार करा ज्यात एक मीना नामक मुलगी किंवा राजीव नामक मुलगा आपल्या एचव्हीग्रस्त आईची मनधरणी करतोय व तिला इस्पितळात जाऊन एआरटी (अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी) औषध घ्याला सांगतोय.
 • एक एचव्ही आणि एड्स एक्शन क्लब तयार करून शाळांमध्ये व कुटुंबांमध्ये जनजागृती करा.
 • आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेचे कशी कार्य करते? कोणत्या पदार्थानी आपली रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत आणि रोगांचा सामना करण्यासाठी सुसज्य राहते? एचआयव्ही म्हणजे काय आणि एड्स म्हणजे काय? त्यमधली अक्षरे कशासाठी उभे आहेत? जेव्हा एखाद्याला एचआयव्ही आहे असं माहिती होते तेव्हा काय होते? जेव्हा एखाद्याला एड्स होतो तेव्हा काय होते? एचआयव्ही एक व्यक्तीमधून दुस-या व्यक्तीमध्ये कसा जातो? ते कसे होत नाही? आपण त्यापासून स्वतःचे रक्षण कसे करू शकतो? लोकांवर एचआयव्हीचे परीक्षण आणि उपचार कसे करतात? मातेपासून तिच्या मुलाला एचआयव्ही जाण्याचा धोका कमी करण्यास औषधे कशी मदत करू शकतात? एआरटी (अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी) कशाप्रकारे काम करते आणि त्याचे औषध कधी घ्यावे? आपल्या मैत्रीचं रूपांतर लैंगिक संबंधात कधी व केव्हा होते? एखादी व्यक्ती योग्यरीत्या निरोध कशी वापरते? (पुरुष / महिला) एचआयव्हीग्रस्त मित्र आणि कुटुंबांना योग्यरीत्या जगण्यासाठी सहाय्य करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणते आहे? एचआयव्ही आणि एड्ससंबंधी मदत करणारे सर्वात जवळचे क्लिनिक कोठे आहे?

“जीवनरेखा खेळ”, “आशेची भरारी” किंवा “खरा किंवा खोटं” चा उदाहरण याबद्दल अधिक माहितीसाठी www.childrenforhealth.org किंवा clare@childrenforhealth.org वर संपर्क साधा.

मराठी Home