Our Messages in Marathi | मराठी

लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश हे सोपे आणि विश्वसनीय शैक्षणिक संदेश असून ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तयार केले आहेत. म्हणून यामध्ये १० ते १४ वयोगटातील तरुण किशोरवयीन मुले समाविष्ट आहेत. आम्हाला असे वाटते की १० ते १४ वयोगटातील मुलांना ह्या विषयाबद्दल माहिती आहे, हे खात्री करून घेणे उपयोगी आणि महत्वाचे आहे. कारण अनेकदा ह्या वयोगातील मुले आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतात. तसंच ह्या कार्यासाठी त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्वाचे आहे.

हे १०० संदेश १० मुख्य आरोग्य विषयक भागात विभाजित असून, प्रत्येक भागात १० संदेश सामावीत आहेत. जसे मलेरिया, अतिसार, पोषण, खोकला, सर्दी आणी आजार, आतड्यांसंबंधी कृमी, पाणी आणि स्वच्छता, लसीकरण, एचआयव्ही आणी एड्स आणि अपघात, जखम आणि बाल विकास. हे सोपे आरोग्य संदेश पालक आणि आरोग्य शिक्षक घरांमध्ये, शाळांमध्ये, क्लबमध्ये व चिकित्सालयात शाळेत मुलांच्या विकासासाठी वापरू शकतात.

हे सोपे आरोग्य संदेश पालकांना आणि आरोग्य शिक्षकांना घरी आणि शाळेत मुलांच्या विकासासाठी उपयोगी आहेत. आरोग्य शिक्षकांनी आणि वैद्यकीय तज्ञांनी हे आरोग्य संदेश विकसित केले आहेत आणि त्यांचे पुनरावलोकन केले आहे. त्यांचे भाषांतर आणि अनुरुप केले जाऊ शकते परंतु आरोग्य संदेश कायम योग्य ठेवावे. आरोग्य संदेश अचूक आणि अद्ययावत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी उत्कृष्ट काळजी घेतली गेली आहे. आरोग्य शिक्षक हे आरोग्य संदेश त्यांच्या वर्ग आणि प्रकल्पांमध्ये आरोग्याचा शिक्षण उपक्रम, चर्चा उत्तेजित करण्यासाठी आणि इतर उपक्रम संरचनेसाठी वापरतात.

उदाहरणार्थ, योग्य हात धुणे विषयी संदेश शिकल्यानंतर, मुले एकमेकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विचारू शकतात ‘आपल्या कुटुंबाला आणि आपल्या समाजाला हात योग्य रितीने धुण्यास कठीण का वाटते ?’ मुलांचे अशा विषयांबद्दल संवाद साधणे आणि ह्या समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी एकत्रितपणे घेतलेले निर्णय आणि अशाप्रकारे ते समाजात बदल घडवून आणणारे कार्यकर्ते बनणे हा आरोग्य संदेश शिकण्यामागे मूल्य आहे. हे संदेश चर्चा आणि कृतीसाठी एक सुरुवात आहे.

पालक किंवा शिक्षक मुलांना आरोग्य संदेश लक्षात ठेवण्यास सांगू शकतात. किंवा, मुले आरोग्य संदेश लक्षात ठेवण्यासाठी काही उपक्रम राबवू शकतात. जी मुले हे संदेश शिकली आहेत आणि ज्यांनी इतरांना समजावून सांगितले आहे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लहान बक्षिसे वापरली जाऊ शकतात. उदाहरणार्थ, एक रिबन किंवा रंगीत कपडा बक्षिस म्हणून दिला जाऊ शकतो. मुले नंतर एका काठीला ते बांधून आणि रंगीत इंद्रधनुष्य काठी तयार करून आनंदाने त्यांनी शिकलेले आणि प्रसारित केलेले आरोग्य संदेश दाखवू शकतात.

लहान मुलांसाठी शिकण्याकरिता आणि प्रसारण करण्याकरिता १०० आरोग्य संदेश, मुलांसाठी आरोग्य (चिल्ड्रेन फॉर हेल्थ), यूकेमधील कॅम्ब्रिजमध्ये स्थायी लहान स्वयंसेवी संस्थाद्वारे निर्मित आहेत. चिल्ड्रेन फॉर हेल्थ जगभरातील आरोग्य शिक्षण भागीदारांबरोबर कार्य करते.

तज्ञ आरोग्य शिक्षक आणि वैद्यकीय चिकित्सकांनी आरोग्य संदेशांचे पुनरावलोकन केले आहे आणि ही माहिती ORB आरोग्य वेबसाइटवर उपलब्ध आहेत: http://orbhealth.com.

  1. बाळांची काळजी घेणे
  2. खोकला, सर्दी आणि आजार
  3. लसीकरण
  4. मलेरिया
  5. अतिसार
  6. पाणी आणि स्वच्छता
  7. पोषण
  8. आतड्यांसंबंधी जंतू
  9. अपघात आणि दुखापतींपासून बचाव
  10. एचव्ही आणि एड्स